त्वचा सुंदर करण्यासठि

खोबरेल तेलाचे केसांसाठी उपयोग

 

                                          खोबरेल तेलाचे केसांसाठी उपयोग




केस काळेभोर कसे राहतील?
नैसर्गिकरीत्याच आपण आपले केस काळेभोर ठेवू शकतो.  एक वाटी खोबऱ्याचे तेल घ्यावे.  कढीपत्ता चिमूटभर पाने घ्यावीत.  थोडा कोरफडचा आतील गर घ्यावा.  खोबऱ्याचं तेल गॅसवर मंद आचेवर गरम करत ठेवावे.  त्यामध्ये कढीपत्त्याची पाने व कोरफड घालावी.   तेलातील पाण्याचे अंश पूर्णपणे संपेपर्यंत तेल चांगलं गरम होऊ द्यावे.   हे तेल थंड करून बॉटलमध्ये भरून ठेवावे.  हे तेल आठवड्यातून किमान दोन वेळा तरी लावावे.  या तेलामुळे केस काळेभोर होतात व केसांवर शाईन येते. 

                                       

 केस लांब सडक वाढण्यासाठी

 एका वाटीत खोबरेल तेल घ्यावे व जास्वंदीची फुलं घ्यावीत.  खोबऱ्याचं तेल गॅसवर मंद आचेवर  गरम करत ठेवावे.  तेल चांगले गरम झाल्यावर त्यामध्ये जास्वंदीचे फूल टाकावीत.  तेलातील फुलं चांगली कुरकुरीत व ब्राउनीश झाल्यावर गॅस बंद करावा.  हे तेल थंड झाल्यावर केसांना  लावण्यास घ्यावे.  या तेलामुळे केसांना नैसर्गिक  रित्या पोषण मिळते व केस लांब सडक होतात. 

                                        

केस सिल्की होण्यासाठी

  थोडसे खोबरेल तेल घेऊन त्यात कोरफडीचा  गर घालावा.  हे तेल  मंद आचेवर गरम करून घ्यावे.  त्यातील पाण्याचा अंश पूर्णत संपेपर्यंत तेल गरम करत ठेवावे.  तेल थंड झाल्यावर केसांना लावावे.  या तेलामुळे केसांची नॅचरलि शाईन वाढते.


 केस सिल्की होण्यासाठी

  थोडसे खोबरेल तेल घेऊन त्यात कोरफडीचा  गर घालावा.  हे तेल  मंद आचेवर गरम करून घ्यावे.  त्यातील पाण्याचा अंश पूर्णत संपेपर्यंत तेल गरम करत ठेवावे.  तेल थंड झाल्यावर केसांना लावावे.  या तेलामुळे केसांची नॅचरलि शाईन वाढते. 


केस लांब सडक  मजबूत होण्यासाठी

 थोडसे खोबरेल तेल घेऊन त्यात कोरफडीचा  गर घालावा. एक E विटामिन कॅप्सूल घ्यावी आणि एक चमचा मध घ्यावे हे मिश्रण चांगले एकजीव करून फ्रिजमध्ये ठेवावे हे मिश्रण केस धुणे अगोदर दोन तास केसांना लावावे त्यामुळे केस लांबसडक आणि  मजबूत होतात होतात. 

                                 

 केसांमधील कोंडा जाण्यासाठी

 खोबऱ्याचं तेल थोडस गरम करून त्यामध्ये अर्धा लिंबू चा रस टाकावा हे मिश्रण केसांना लावल्यास केळ केसांमधील कोंडा दूर  होतो.

                                

टिप्पण्या