रोजी
skin glowing
skincare
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पायांच्या भेगांसाठी
पायांना भेगा पडण्याची अनेक कारणे आहेत. काहीवेळा थंडीमुळे पायांना भेगा पडतात, तर काही वेळा वजन वाढल्याने सुद्धा पायांना भेगा पडतात. पायांची नीट काळजी घेतली तर ह्या समस्या सुद्धा दूर होऊ शकतात. तर आपला तर जाणून घेऊया पायांच्या भेगा दूर होण्याचे उपाय.
एका टपामध्ये कोमट पाणी घ्यावे, त्यामध्ये थोडंसं मीठ व शाम्पू घालावा. त्या पाण्यात थोडा वेळ पाय बुडवून ठेवावेत. पाच मिनिटांनी पाय चांगले घासावेत असं केल्यामुळे पायाच्या भेगा मधील सर्व माती धूळ सर्व प्रकारची घाण बाहेर पडेल. त्यानंतर पाय सुक्या कपड्याने साफ करून घ्यावेत. एका वाटीत अर्धा चमचा ग्लिसरीन अर्धा चमचा एलोवेरा जेल आणि अर्धा चमचा व्यासलीन घ्यावे हे मिश्रण चांगले मिक्स करून रोज रात्री झोपताना पायांना लावावे आठ दिवसांमध्ये तुम्हाला फरक दिसून येईल.
व्यासलीन आणि लिंबूचा रस हे मिश्रण एकत्रित चांगले मिक्स करून रोज रात्री झोपताना लावल्यास पायांच्या भेगा बऱ्याच प्रमाणात कमी होतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा