त्वचेसाठी
नियमित साबण वापरण्याऐवजी हिरव्या चनाडाळीचे पीठ व पिवळ्या चनाडाळीचे पीठ समप्रमाणात घेऊन दुधात भिजवून संपूर्ण अंगाला लावावे.
- १ टेबल स्पून ग्लिसरीनमध्ये हर्बल तेल किंवा आवळा तेल ५ ते १० थेंब टाकून चेहऱ्यावर लावावे. मुलायम मऊ त्वचा होण्यासाठी असे नियमित करावे. तोंड धुतल्यावर गुलाब पाणी चेहऱ्याला लावावे. त्वचा मृदू होते. ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांच्यासाठी ही कृती लाभदायक आहे.
- ओली हळद व मोहरी वाटून दररोज ब्लॅक हेडस/पिंपल्स झालेल्या ठिकाणी लावावे. हळू-हळू ब्लॅक हेडस कमी होतात.
- १ लिंबू , १ अंडे एकत्र फेटून चेहऱ्यावर लावावे. साधारण वीस मिनिटांनी धुवावे.
- त्वचा मृदू , मुलायम , स्निग्ध व सतेज राहण्यासाठी दह्याने मसाज करावा.
- चिंचेचा कोळ व गोडे जिरे समप्रमाणात घेऊन दुधात पेस्ट करावी. त्यात थोडी मलई घालून चेहऱ्यावर लावून वीस मिनिटांनी धुवावे. हे मिश्रण आठवडयातून दोन वेळा लावावे.
- त्वचेसाठी मॉइश्चरायझर अत्यंत उपयुक्त ठरते. त्वचेचा ओलावा टिकवून बाहेरील वातावरणाचा त्वचेवर परिणाम होऊ न देणे यालाच त्वचेवरील मॉइश्चरायझर टिकवणे असे म्हणतात. घरातील काही वस्तू व काही विकत आणलेल्या पदार्थापासून घरीच मॉइश्चरायझर करून त्वचेला चमक आणता येते.
- ओटचे पीठ , चंदनाचे चूर्ण , १ टेबल स्पून ओट व १/४ टेबल स्पून चंदन पूड त्वचेवर चोळावे. थोडया वेळाने धुऊन टाकावे. कच्च्या बटाट्याचे पातळ चकत्यांसारखे कापून चेहऱ्यावर पसरून बारा-पंधरा मिनिटे शांत पडावे. नंतर धुऊन चेहरा टिपून घ्यावा. चेहरा मुलायम व स्निग्ध राहतो. ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांच्यासाठी ही कृती उपयोगी आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा