त्वचा सुंदर करण्यासठि

डोळ्यांचे डार्क सर्कल

 

                                                                       डोळ्यांचे डार्क सर्कल

  • एक टोमॅटो, एक चमचा लिंबाचा रस, चिमटीभर बेसन आणि हळद हे एकत्र मिक्सरमध्ये लावून घ्या. हे दाटसर पेस्ट डोळ्यांभोवती लावा. कमीत कमी 15 ते 20 मिनिटे ठेवून द्या. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. हे हप्त्यामध्ये तीन वेळा करा.




  • डोळ्याभोवतालची त्वचा संवेदनशील असते. म्हणून डोळ्यांभोवती बदामाचं तेल लावून रात्री झोपल्यास सकाळी धुऊन टाकावे. असे केल्याने डोळे चमकदार दिसतात.



  • डोळ्यांची वर्तुळे कमी करण्यासाठी एक बदाम घेऊन चंदन उगळयच्या सान वरती थोडासा दूध घेऊन उगळून घ्यायचे. ही पेस्ट डोळ्यांभोवती लावायची. हे लावल्यामुळे निश्चितच फरक दिसून येईल.



  • संत्र्याचा रस आणि ग्लिसरीन एकत्र मिक्स करून डोळ्यांभोवती लावल्याने डार्क सर्कल बरेच कमी होतात.

टिप्पण्या