त्वचा सुंदर करण्यासठि

त्वचा उजळण्यासाठी

                                                         

                                                                 त्वचा उजळण्यासाठी



1.   एक  चमचा बेसन घ्या त्यात पाव चमचा हळद मिक्स करा त्यामध्ये थोडंसं दूध टाकून मिक्स करून घ्या मिश्रण चांगलं क्रिमी बनवून घ्या चेहरा चांगला साध्या पाण्याने धुऊन घ्या आणि हे  मिश्रण चेहऱ्यावरती लावून द्या पंधरा ते वीस मिनिटाने चेहरा  चांगल्या पाण्याने धुऊन घ्या.  हे आठवड्यातून दोन वेळा करा दोन आठवड्यात तुम्हाला फरक दिसून जाईल. 



2.  एक लहान चमचा उठणे घ्या त्यामध्ये अर्धा चमचा मसूर डाळ पीठ घ्या पाव चमचा हळद घ्या हे मिश्रण गुलाबजल टाकून चांगलं  मिक्स करून घ्या हे मिश्रण रोज आंघोळ करताना साबणाऐवजी चेहऱ्याला लावा त्वचा चांगली उजळ आणि तजेलदार होईल. 



3.  एक चमचा कोरफड जेल  घेऊन त्यामध्ये विटामिन  ई कॅप्सूल मिक्स करा रोज रात्री झोपताना चेहऱ्यावर ती लावा सकाळी  उठून चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या चेहरा चांगला  मुलायम आणि उजळ होईल.


टिप्पण्या